महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाचे नऊ नवे रुग्ण, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दिलासादायक

जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या 436 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण नाही. हातकणंगले आणि शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजेच 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

nine new corona cases found in kolhapur
कोल्हापूरात कोरोनाचे नऊ नवे रुग्ण

By

Published : May 29, 2020, 12:28 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या शाहूवाडी तालुक्यात आहे. आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 140 रुग्ण हे एकट्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात शाहुवाडीतील चारजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या 436 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण नाही. हातकणंगले आणि शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजेच 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे अत्यंत दिलासादायक चित्र आहे. कोल्हापुरात आजपर्यंत एकूण 91 रुग्ण कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. शिवाय जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदरदेखील खूप कमी आहे. आजपर्यंत एकूण 436 रुग्णांपैकी 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यातील दोघांचा उपचारापूर्वी तर दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

गुरुवारी रात्री 9 ते आज सकाळी 10 दरम्यान जिल्ह्यातील 313 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details