कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, रात्रीपासून राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शिरोलीमध्ये महामार्गावर पाणी आल्यामुळे रात्री १२ नंतर महामार्गावरतची वाहतूक बंद झाली. त्यामुळे, कोल्हापूरचा मुंबई, पुणे आणि कोकणाशी संपर्क तुटला आहे. शिवाय, बेळगाव आणि बंगळुरूकडे जाणारी वाहतूकही बंद होण्याची शक्यता आहे.
VIDEO : कोल्हा'पूर' जलमय.. चारीबाजुंनी संपर्क तुटला, पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग इतिहासात पहिल्यांदाच पाण्याखाली - NH 4 blocked
पंचगंगा नदीची पाणीपातळी ५१ फूट ६ इंच एवढी झाल्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
NH 4 blocked since midnight due to heavy rain kolhapur got disconnected from mumbai pune and kokan
दरम्यान, पंचगंगा नदीची पाणीपातळी ५१ फूट ६ इंच एवढी झाल्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. जिल्ह्यातील १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच, कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात देखील पाणीच पाणी झाले आहे.
Last Updated : Aug 6, 2019, 12:22 PM IST