महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Married Couple Suicide In Kolhapur: प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याची सात महिन्यात आत्महत्या; घटनेपूर्वी भावाला पाठविले लोकेशन - कुटुंबाला जबरदस्त धक्का

आंतरजातीय प्रेम विवाह केलेल्या दाम्पत्याने आपल्या चुलत भावाला लोकेशन पाठवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली येथील एका शेतातील पत्र्याचे शेडमध्ये त्यांनी गुरुवारी दुपारी जीवन संपविले. राहुल राजाराम परीट (वय वर्षे 23) आणि अनुष्का राहुल परीट (वय वर्षे 21) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

Married Couple Suicide In Kolhapur
घटनेपूर्वी भावाला पाठविले लोकेशन

By

Published : Jul 28, 2023, 10:53 PM IST

कोल्हापूर :जानेवारी महिन्यातच राहुल परीट याचा अनुष्का कांबळे या तरुणीसोबत आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता. या विवाहाला घरातील सदस्यांनीसुद्धा मान्यता देत स्वीकारले होते; मात्र काल अचानक त्यांनी आत्महत्या केली असून याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

लोकेशन पाठवून आत्महत्या :राहुल परीट हा काही दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील सावर्डे या गावात महावितरणमध्ये वायरमन म्हणून बदली झाला होता. अनुष्का ही कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी अनुष्काला कॉलेजला सोडून कामावर जातो असे सांगत दोघेही घराबाहेर पडले; रात्री दहा वाजता आपण कोल्हापुरातच थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुलने आपल्या वडिलांना घरी येत असल्याचे सांगितले. यानंतर तो मित्रासोबत सोशल मीडियावर चॅटिंग करत बसला. दरम्यान त्याने आपल्या चुलत भावाला इस्पुर्ली येथील लोकेशन पाठवले आणि फोन बंद केला. बराचवेळ झाला तरी तो घरी आला नाही. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याला फोन लावले असता फोन पण लागला नाही.

कुटुंबाला जबरदस्त धक्का :राहुलने पाठवलेल्या लोकेशनच्या आधारे त्यांचा पत्ता शोधून काढला असता इस्पुर्ली येथे एका शेतात पत्र्याच्या शेड जवळ राहुलची मोटरसायकल सापडली. दरम्यान शेडमध्ये गेले असता पती-पत्नी दोघांनीही आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी नातेवाईकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले. राहुल आणि अनुष्काने उचललेल्या या टोकाच्या पावलाने कुटुंबाला चांगलाच धक्का बसला आहे.


आर्थिक फसवणुकीतून आत्महत्या -राहुल परीट आणि अनुष्का कांबळे या दोघांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. यातूनच जानेवारी महिन्यात दोघांनी लग्न देखील केले. घरच्यांनी देखील दोघांना स्वीकारले होते. मात्र, दोघांनी टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही. आर्थिक फसवणुकीतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details