कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. जिल्ह्यात आणखी 42 जणांना कोरोनाची लागण झाली असून 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर हातकणंगलेमधील 70 वर्षांचा वृद्धाचा मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या 42 रुग्णांनंतर सद्यस्थितीत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या आता 609 वर पोहोचली आहे.
कोल्हापुरात आढळले 42 नवे कोरोना रुग्ण; तर एकाचा मृत्यू
आणखी 42 जणांना कोरोनाची लागण झाली असून 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर हातकणंगलेमधील 70 वर्षांचा वृद्धाचा मृत्यू झाला आहे. नवीन आढळलेल्या 42 रुग्णांनंतर सद्यस्थितीत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या आता 609 वर पोहोचली आहे.
आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 583 वर पोहोचली आहे. त्यातील 934 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 609 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोल्हापूरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. शिवाय मृत्यूंची सांख्य सुद्धा वाढत चालली असून, कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे.
तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : आजरा- 97 ,भुदरगड- 81 , चंदगड- 181 , गडहिंग्लज- 135 , गगनबावडा- 7 , हातकणंगले- 44 ,,कागल- 64 , करवीर- 142 , पन्हाळा- 57 , राधानगरी- 76 , शाहूवाडी- 195 , शिरोळ- 35 , नगरपरिषद क्षेत्र- 244 , कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 189 , असे एकूण 1 हजार 547 इतर जिल्हा व राज्यातून आलेले 36 असे मिळून एकूण 1 हजार 583 रुग्ण आहेत.