महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NDRF Squad In Kolhapur: NDRF कडून प्रयाग-चिखली संगमाची पाहणी; परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती - situation under control

कोल्हापूरच्या आंबेवाडी आणि चिखली गावाला दरवर्षी सर्वात जास्त महापुराचा फटका बसतो. यामुळे NDRF कडून आज चिखली गावातील प्रयाग संगमावर पाहणी ( Survey from NDRF Squad )करण्यात आली. पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले असल्याने पूर आलाच तर पुराशी सामना करण्यासाठी NDRF तयार असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

NDRF Squad In Kolhapur
कोल्हापूरमध्ये एनडीआरएफ पथक दाखल

By

Published : Jul 7, 2022, 5:14 PM IST

कोल्हापूर -कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ ( heavy rain in Kolhapur ) घालत आहे यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ ( Panchganga water level rise ) होत असल्याने यंत्रणा देखील अलर्ट मोड वर गेली असून NDRF पथकाकडून दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या गावांची पाहणी करण्यात येत आहे. सध्या काल रात्री पासून पाऊसाने काही काळ विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सध्या संथ गतीने वाढ होत आहे. मात्र हवामान खात्याकडून जिल्ह्याला 2 ते 3 दिवस रेड अलर्ट ( red alert ) जारी केल्याने NDRF चे सह्याक कमांडर प्रवीण धत आज कोल्हापुरात दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण टीमसह सर्वात जास्त महापुराचा फटका बसणाऱ्या प्रयाग चिखली संगमावर भेट देऊन पाहणी केली आहे .तसेच परिस्थिती सध्या नियंत्रणात असून आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास NDRF सामना करण्यासाठी तयार असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोल्हापूरमध्ये एनडीआरएफ पथक दाखल

पाणी पातळीत संथ गतीने वाढ - जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर सदृश्य परीस्थिती निर्माण होत आहे. कारण गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले आहे. धरण क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने राधानगरी धरणातून पायथा विद्युत गृहातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून आता पर्यंत जिल्ह्यातील 26 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर आज सकाळी 10 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 32 फुटांवर गेली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे. तर, धोका पातळी 43 फूट इतकी आहे. सध्या शहरात पावसाने काहीकाळ विश्रांती घेतल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत आहे.

NDRF पथकाकडून प्रयाग चिखली परिसराची पाहणी - आंबेवाडी आणि चिखली गावाला दरवर्षी सर्वात जास्त महापुराचा फटका बसतो. महापुरात संपूर्ण गाव पाण्याखाली जात असल्याने दरवर्षी NDRF कडून या दोन्ही गावात रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत असते. यामुळे NDRF कडून आज चिखली गावातील प्रयाग संगमावर पाहणी करण्यात आली. सध्या नदीची वाटलाच इशारा पातळीकडे होत असली तरी काल पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरी पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले असल्याने पूर आलाच तर पुराशी सामना करण्यासाठी NDRF तयार असल्याचे सह्याक कमांडर प्रवीण धत यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यांच्यावर एम्समध्ये उपचार; प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details