कोल्हापूर -कोल्हापूर शहरात पेट्रोलच्या दरवाढीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. एक व्यक्ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवतारच घेऊन पेट्रोल पंपावर उतरला. 'मुझ पर भरोसा मत करो.. मै मोदी हू', 'मै कुछ भी कर सकता हु.. रात के 12 बजे के बाद..' असे उपरोधात्मक आंदोलन आज राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टीच्या वतीने करण्यात आले.
VIDEO : चक्क नरेंद्र मोदीच अवतरले पेट्रोल पंपावर अन् म्हणाले मुझपर भरोसा मत करो ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. या दरवाढीविरोधात आज कोल्हापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरले होती. कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावर उपरोधात्मक आंदोलन करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवतार घेतलेल्या व्यक्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. या दरवाढीविरोधात आज कोल्हापुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरले होती. कोल्हापुरातील एका पेट्रोल पंपावर उपरोधात्मक आंदोलन करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवतार घेतलेल्या व्यक्तीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वेषात हे आंदोलन केल्याने त्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवतार घेतलेल्या नागरिकाने हातात हेल्मेट आणि बॅट उंचावत पेट्रोल दरवाढीचे शतक झळकवले असे दाखवले. तसेच यावेळी पंतप्रधानांच्या वेशात असलेल्या नागरिकाने उपस्थितांना संबोधित केले. मै मोदी हु, मोदी हो तो मुमकिन है! मै कुछ भी कर सकता हु! लेकिन रात के 12 बजे के बाद! मे पेट्रोल के दाम बढा सकता हु! मे लोगो की परवा कर नही सकता! मुझ पर भरोसा मत करो! अशा प्रकारचे संबोधन करून पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
देशात पेट्रोल व इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशात पेट्रोल आणि इंधन दर वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. यांच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीण यांच्या वतीने चक्क मोदी साहेबांना (प्रतिकात्मक) पेट्रोल पंपावर बोलवून समस्या मांडल्या. घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, कार्याध्यक्ष प्रेम भोसले, कल्पेश चौगुले, रविराज सोनूले, सचिन मुदगल, हातकणंगले तालुका अध्यक्ष संतोष वडेर, विधानसभा अध्यक्ष अजित मोरे आदी उपस्थित होते.