महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राष्ट्रवादीकडून तयारी सुरू

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकही ( Municipal Elections ) चार वेळा पुढे ढकलली आहे. प्रभाग रचनेच्या मुद्यावरून निवडणूक पुन्हा सहा महिने लांबणीवर गेली आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी वेगवेगळे सामोरे जाऊ, असे राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) तसेच काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीकडून तयारी सुरू
राष्ट्रवादीकडून तयारी सुरू

By

Published : Apr 20, 2022, 5:02 PM IST

कोल्हापूर - कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकही ( Municipal Elections ) चार वेळा पुढे ढकलली आहे. प्रभाग रचनेच्या मुद्यावरून निवडणूक पुन्हा सहा महिने लांबणीवर गेली आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आतापासूनच तयारीला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्वतः पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar Visit Kolhapur ) यांनीही राज्यभर राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शनिवारी (दि. 23 एप्रिल ) कोल्हापुरात शरद पवार यांची सभा होणार आहे तर गुरुवारी (दि. 21 एप्रिल) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) हे सुद्धा याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आढावा बैठक घेणार आहेत.

महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची याआधीच मुश्रीफ यांच्याकडून घोषणा -दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर, 2020 मध्ये संपली आहे. मात्र, कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा निवडणुकांचे बिगुल वाजले अंतिम प्रभाग रचना जाहीर होतील, असे असतानाच प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्याचा नवा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. याच आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी वेगवेगळे सामोरे जाऊ, असे राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) तसेच काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patil ) यांनी म्हटले आहे. निवडणुकीत काहीही होऊदेत मात्र नंतर गरज पडली तर भाजप विरोधात आपण एकत्र येऊ असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी जरी निवडणूक वेगवेगळ्या लढण्याची घोषणा केली असली तरी वेगवेगळे लढल्यानंतर त्याचा भाजपला फायदा होईल, अशी शक्यता नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवरून दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादीकडून सर्वच कार्यकर्त्यांना आढावा बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना -दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उद्या होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व महिला, युवक, विद्यार्थी, सेवादल, क्रीडा, सामाजिक न्याय, ओबीसी, अर्बन, उद्योग व व्यापारी, पदवीधर, असंघटित कामगार, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तसेच कोल्हापूर महापालिका वॉर्ड समिती पदाधिकारी तसेच नगरसेवक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यातील कार्यकर्त्यांशी जरी हा संवाद साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असली तरी आगामी निवडणुकांची जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून केली जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.

हेही वाचा -BJP state vice president Suresh Halvankar : वीजटंचाईतील ‘टक्केवारी’ जाहीर करा - भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details