कोल्हापूर - इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत रस्त्यावर उतरून इंधन दरवाढीचा निषेध केला. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे त्यांनी आंदोलन केले.
कोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर - राष्ट्रवादी काँग्रेस
शासनाचा निषेध करीत दरवाढ कमी करण्यात यावी, अशा घोषणा देत प्रमुख मार्गावरून शहरातील पेट्रोल पंपांवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना प्रतिकात्मक गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करित त्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले.
शासनाचा निषेध करीत दरवाढ कमी करण्यात यावी, अशा घोषणा देत प्रमुख मार्गावरून शहरातील पेट्रोल पंपांवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना प्रतिकात्मक गुलाबाचे फुल देऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन करित त्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
राज्यात सर्वत्र महागाई प्रचंड वाढली आहे. शेतकर्यांची फारच वाईट अवस्था निर्माण झाली आहे. शिकलेल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. समाजातील कोणताही घटक समाधानी नाही असे म्हणत, भाजप-शिवसेना आघाडीला सत्तेची धुंदी आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.