महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : सभा राष्ट्रवादीची व्यासपीठाची रचना मात्र सतेज पाटील यांच्या विरोधात ?

सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधातील भूमिका घेत 'आमचं ठरलंय' असं स्पष्ट केले. हाच विरोध पाहून आजच्या राष्ट्रवादीच्या सभेची रचना सतेज पाटील यांच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळाले.

By

Published : Apr 18, 2019, 11:01 AM IST

कोल्हापुरात राष्ट्रवादीची सभा

कोल्हापूर - महायुतीच्या कोल्हापुरातील झालेल्या विराट सभेनंतर राष्ट्रवादीची सुद्धा येथील गांधी मैदान येथे सभा होत आहे. ही सभा युतीच्या उमेदवाराच्या विरोधात जरी असली तरी; व्यासपीठाची रचना मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सभास्थळी शरद पवार यांची सभा नेमकी कोणाच्या विरोधात अशी चर्चा सुरू होती.

कोल्हापुरात राष्ट्रवादीची सभा

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात टोकाचा विरोध संपूर्ण राज्याने पहिला आहे. सतेज पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधातील भूमिका घेत 'आमचं ठरलंय' असं स्पष्ट केले. हाच विरोध पाहून आजच्या राष्ट्रवादीच्या सभेची रचना सतेज पाटील यांच्या विरोधात असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापर्यंत सुद्धा सतेज पाटील यांचे आमचं ठरलंय हे वाक्य पोहोचले आणि पवारांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून 'मी बी ध्यानात ठेवलंय' असं म्हटले आहे.

शरद पवार यांच्या मी बी ध्यानात ठेवलंय या वाक्याचे गांधी मैदान येथील सभेच्या ठिकाणी अनेक बॅनर लागल्याचे पाहायला मिळाले. खासदार धनंजय महाडिक यांची शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासोबत लढत होत आहे. पण मंडलिक यांच्या विरोधापेक्षा आमदार सतेज पाटील यांच्यात विरोधातील वातावरण सभेच्या व्यासपीठाच्या रचनेवरून पाहायला मिळाले. लावलेल्या मी बी ध्यानात ठेवलंय या बॅनरवरून आमदार सतेज पाटील यांच्याबद्दल शरद पवार वडगावच्या सभेनंतर पुन्हा काही बोलतील का अशी चर्चा होती. पण पवारांनी स्थानिक वादाच्या विषयावर बोलण्याचे टाळले. पण व्यासपीठाच्या रचनेवरून ही सभा नेमकी कोणाच्या विरोधात, अशी चर्चा याठिकाणी सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details