महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवरात्रोत्सव 2019 : तिरुपतीवरून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू - navratrotsav 2019 Kolhapur

तिरुमल्ला देवस्थानचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी तिरुपतीवरून कोल्हापुरात शालू घेऊन आले होते. स्वतः आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही परंपरा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण आज हा मानाचा शालू घेऊन आल्याचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी यांनी सांगितले.

नवरात्रोत्सव 2019 : तिरुपतीवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला मनाचा शालू

By

Published : Oct 3, 2019, 10:56 AM IST

Updated : Oct 3, 2019, 8:09 PM IST

कोल्हापूर - तिरुपती बालाजी संस्थान तिरुमलावरून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठविण्याची एक प्रथा आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही तिरुपतीवरून आलेला हा मानाचा शालू बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला. पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे हा सोहळा देवस्थान समितीच्या कार्यालयात पार पडला.

तिरुपतीवरून कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू

हेही वाचा -गांधी@१५० : पंतप्रधान मोदी यांनी केली 'ईटीव्ही भारत'च्या गीताची प्रशंसा

यावेळी तिरुमल्ला देवस्थानचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी तिरुपतीवरुन कोल्हापुरात शालू घेऊन आले होते. ही परंपरा गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. आम्ही तिला सुरू ठेवण्यासाठी आलो आहोत. तसेच स्वतः आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही परंपरा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण आज हा मानाचा शालू घेऊन आल्याचे चेअरमन वाय. सुब्बारेड्डी यांनी सांगितले.

हेही वाचा -'भाजप गुंडांना तिकीट देते, त्यामुळे दाऊदच्या टोळीतील लोकदेखील खासदार झालेत..'

देवस्थान समितीकडे सुपूर्त केलेला हा शालू येणाऱ्या काळात नेसवला जाणार आहे. शालू घेऊन आलेल्या तिरुमल्ला देवस्थानच्या सर्वांचे पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिवाय देवी अंबाबाईची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मानसुद्धा यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. तिरुपतीवरुन अंबाबाई देवीला आलेल्या या आहेराला मोठे महत्व आहे.

हेही वाचा -'सरकारने ६० महिन्यांमध्ये ६० कोटी लोकांना शौचालये उपलब्ध करून दिली..'

Last Updated : Oct 3, 2019, 8:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details