महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हा'पूर' : नृसिंहवाडीचे दत्त मंदिर तिसऱ्यांदा पाण्याखाली - Narsinghwadi Dutt Temple

नृसिंहवाडी दत्त मंदिरात तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला. मंदिर परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कृष्णेच्या पाण्यातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर

By

Published : Sep 7, 2019, 2:14 PM IST

कोल्हापूर - सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा, कृष्णा, कोयना या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.

कृष्णेच्या पाण्यातील नृसिंहवाडीचे दत्त मंदिर

हेही वाचा - कोल्हापूर : पंचगंगेच्या महापुरात उद्धवस्त झालेल्या चिखली गावाचे भयान वास्तव

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी मधील दत्त मंदिरात यंदा तिसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा पार पडला असून मंदिर परिसरात सध्या पाणीच पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरू होणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

हेही वाचा - महापुरानंतर कोल्हापूर शहराच्या रेड झोनचा मुद्दा ऐरणीवर

ABOUT THE AUTHOR

...view details