महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Narayan Rane Criticized Ajit Pawar : अजित पवारांनी माझ्या फंद्यात पडू नये; नाहीतर... वाजवेन; नारायण राणेंचा इशारा

अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत हे मला माहीत नाही आणि मला बोलायची गरज नाही. त्यांनी बारामतीच्या बाहेर येऊन दुसऱ्यांचे बारसे करू नये आणि माझ्या फंद्यात पडू नये. नाहीतर पुण्यात येऊन मी त्यांचे बारा वाजवेन, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांना दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

Narayan Rane Criticized Ajit Pawar In Kolhapur
राणे

By

Published : Feb 25, 2023, 8:20 PM IST

नारायण राणे यांची अजित पवारांवर टीका

कोल्हापूर: उद्धव ठाकरे यांना कोणतेही अस्तित्व नाही. त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे असेही नारायण राणे यावेळी म्हणाले आहेत. त्याच कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी सपत्नीक करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले तसेच माध्यमांशी देखील संवाद साधला. आजपर्यंत माझ्या आयुष्यात जे जे चांगले प्रसंग आले ते केवळ तुझ्यामुळे आले आणि तुझा आशिर्वाद सदैव आमच्या सोबत राहू दे अशी प्रार्थना त्यांनी अंबाबाई चरणी केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला फोन करून मंत्री पदाचे देखील ऑफर दिली होती. अशी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

त्यामध्ये मला पडायचे नाही: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्या काही वैयक्तिक गोष्टी झाल्या, त्यामध्ये मला पडायचे नाही. काही जणांना सवय असते कायम तोंड घालण्याची. मात्र त्या दोघांमध्ये जे काही बोलणे झाले ते मला माहीत नाही, असे नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच मी कोणताही ज्योतिषी नाही. कोणता पक्ष कधी संपणार आहे हे सांगायला ज्याचे काम जनता पाहते आणि ज्यांचे काम पोषक आहे त्या पक्षाला जनता निवडून देते. बाकीचे इतिहास जमा होतात असे ते यावेळी म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वावरच प्रश्न:उद्धव ठाकरे यांच्याकडे आता राहिलाय तरी काय? राहिलेले 15-16 आमदार देखील त्यांच्याकडे किती दिवस राहतील, हे सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांना कोणतेही अस्तित्व नाही. त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना सोडलेले सर्व संपतील. मात्र शिवसेना संपणार नाही, असा दावा अनेक वेळा केला जात होता. उद्धव ठाकरे यांना कोणतही अस्तित्व नाही आणि गेलेली लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात, हे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. माझ्याकडे उद्धव ठाकरे यांच्या बद्दलचे अनेक संभाषणाचे ऑडिओ क्लिप आलेत. परंतु, मी त्याचा गैरवापर केला नाही, असे राणे म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खोक्याचे व्यवहार करत असतानाचे आपल्याकडे ऑडिओ क्लिप आहेत. हे सर्व ऑडिओ क्लिप वेळ आल्यावर मी उघड करेल असे नारायण राणे म्हणाले आहेत.

'ते' कधीही काहीही बोलतात: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरून सेवा सुरू आहे. ठाकरे गट आता सर्व काही आम्हीच केले,असे म्हणत आहे. उद्या उठून समुद्र देखील मीच केले असे म्हणतील. मात्र केंद्र शासनाने सही करून आदेश कधी काढला आणि तो कोणाच्या राजवटीमध्ये काढला, हे पाहणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे कधीही काहीही बोलतात. त्यांना साधे मराठी भाषेतील विश्लेषण देखील नीट वापरता येत नाहीत, अशा खोचक शब्दात मंत्री नारायण राणे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मी कोकणातून सहा वेळा निवडून आलो आणि सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून मी बांद्रात उभा राहिलो. मात्र मी तेथे पडलो. महिला असो किंवा पुरुष उमेदवार, हा उमेदवारच असतो असे म्हणत अजित पवार यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

हेही वाचा:Bomb Blast Threat In Mumbai: जे.जे. रुग्णालय, भेंडीबाजार आणि नळबाजार परिसरात बॉम्बस्फोट करणार; हॉक्स कॉलरला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details