महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Muslim Devotees Garlands for Mahaganapati : कोल्हापुरात अनोखं हिंदू मुस्लिम ऐक्य; महागणपतीसाठी 42 वर्ष मुस्लिम भक्त करतो पुष्पहार - महागणपतीचे मुस्लिम भक्त

Muslim Devotees Garlands for Mahaganapati : गणेशोत्सवातून सामाजिक विण घट्ट करण्याचं काम कोल्हापुरात होत आहे. कोल्हापूरमध्ये महागणपती अनेकांचे आराध्य दैवत आहे. याच महागणपतीला आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत भला मोठा पुष्पहार घातला जातो. हा पुष्पहार गेली 42 वर्ष अखंडित तयार करण्याचं काम याच महागणपतीचा एक मुस्लिम भक्त करत आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Mahaganapati kolhapur)

Muslim Devotees Garlands for Mahaganapati
महंमद पठाण महागणपतीसाठी हार विणतात

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 7:50 PM IST

Updated : Sep 21, 2023, 8:16 PM IST

महंम्मद पठाण यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर Muslim Devotees Garlands for Mahaganapati : देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा होत असलेला गणेशोत्सव विधायक कामांनी परिपूर्ण असावा, हाच उद्देश गणेशोत्सवसुरू करणाऱ्या महापुरुषांचा होता. उत्सव साजरा करताना कोणती जात, धर्म आडवा न येता सर्वधर्मसमभावाचं चित्र यातून रेखाटलं जावं, असाच उद्देश ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता. मात्र काळाच्या ओघात या उत्सवाला धार्मिक वादाचे रंग दिले गेले. एकत्रित येणाऱ्या समाजातील सर्व घटकांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करण्याचं कामही झालं. राजर्षी शाहूंच्या विचारानं पुनित झालेल्या कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम धर्मीय सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात एकत्र साजरे करतात. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील महंम्मद पठाण हे त्यापैकीच एक आहेत. कोल्हापूर शहराची ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातच पठाण आपल्या दोन मुलांसह हार विक्रीचा व्यवसाय करतात. गेली 42 हून अधिक वर्ष त्यांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालत आहे.

स्वखर्चातून महागणपतीसाठी पुष्पहार :करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला देशभरातून येणारा भक्त पठाण यांच्या दुकानात थांबून देवीसाठी हार, फुले खरेदी करतो. पठाण यांच्या दुकानासमोरच 1981 पासून शिवाजी चौक तरुण मंडळाची 21 फुटी गणेशमूर्ती विराजमान असते. या तरुण मंडळाचे महंम्मद पठाण हे सदस्य आहेत. श्रद्धेपोटी महंम्मद पठाण हे गणपती आगमन आणि विसर्जन दोन्हीही मिरवणुकीत आपल्या स्वखर्चातून महागणपतीसाठी पुष्पहार तयार करतात. गेली 42 वर्ष ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. (Mahaganapati kolhapur)

हिंदू-मुस्लिम सलोख्याचं प्रतीक :राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या समतेच्या विचाराचे बीज कोल्हापुरात रुजले आहेत. महंम्मद पठाण यांची महागणपतीसह हनुमानावर श्रद्धा आहे. मुलगा फैजल आणि अंजुम यांच्या मदतीनं शिवाजी चौकातच पठाण यांचा हार-तुरे फुलं विक्रीचा व्यवसाय आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणाला कोल्हापुरातील हा मुस्लिम भक्त मनोभावे पुष्पहार तयोर करत आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय श्रद्धेपोटी ते हे करतात. कोल्हापूरच्या महागणपतीमुळेच माझं भाग्य उजळलं, अशी भावनाही महंम्मद पठाण यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केलीय.

तीन महिन्यांपूर्वी दंगल :आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवण्याच्या कारणातून जून महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणारी घटना घडली होती. याच चौकात महंम्मद पठाण यांचे हे दुकान आहे. काही लोकांकडून कोल्हापूर शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. राजर्षी शाहूंच्या विचाराचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूरकरांनी अशा घटनांना भीक घातली नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचार आमच्यासारखे मुस्लिम मावळे आणि भक्त पुढे घेऊन जात आहेत, अशा भावना महंम्मद पठाण यांनी व्यक्त केल्या आहेत.


हेही वाचा :

  1. Ganesh Festival २०२३ : चित्रकारानं पर्यावरण बचाव देखावा साकारत गणरायाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ
  2. Ganesh Festival 2023 : ठाण्यात दीड लाख बाप्पांची होणार प्राण प्रतिष्ठापना! १ हजार ५२ सार्वजनिक बाप्पा विराजमान
  3. Ganeshotsav 2023: गणपती बाप्पा मोरया! पाहा, ढोल ताशांच्या गजरात वृंदावनच्या राजाचं ठाणे नगरीत जल्लोषात स्वागत
Last Updated : Sep 21, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details