कोल्हापूर- जिल्ह्यातील मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. जमादार हे मंडलिक गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. पण बुधवारी नगरपरिषेदेच्या सर्वसाधारण सभेनंतर काही नगरसेवकांच्या समर्थकांकडूनच ही मारहाण झाली आहे.
मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना मारहाण - murgud
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुरगूड नगरपालिका परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

राजेखान जमादार
राजेखान जमादार यांना जबर मारहाण
मुरगूड नगरपरिषेदेची सर्वसाधारण सभा पालिकेत बोलवण्यात आली होती. सभा चालू झाल्यानंतर काही प्रश्नांवर नगरसेवकांत मतभेद झाले. त्यानंतर नगराध्यक्ष राजेखान जमादार हे सभा आटपून बाहेर जात असताना त्यांना काही महिला नगरसेवकांनी अडवून प्रश्न विचारले. त्यावेळी काही नगरसेवकांच्या समर्थकांनी थेट नगराध्यक्ष जमादार यांना मारहाण केली. या घटनेमुळे मुरगूड नगरपालिका परिसरात तणाव निर्माण झाला होता.
Last Updated : Aug 1, 2019, 8:23 AM IST