कोल्हापूर -आरक्षणाच्या मुद्दयावरुन खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आरक्षण गेलं खड्ड्यात' पदवीपर्यंत सर्वच जातींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, असे ट्वीट करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आरक्षण गेलं खड्ड्यात..! पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करा, संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप - kolhapur
आरक्षणाच्या मुद्दयावरुन खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. 'आरक्षण गेलं खड्ड्यात' पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण करा असे ट्वीट त्यांनी केले आहे.
94 टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले अतोनात कष्ट घेऊन गुणांची कमाई करतात. मात्र, त्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याने माझ्या मनात संतापाची भावना आहे. यासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे, ते शक्य नसेल तर किमान १२ वी पर्यंत तरी शिक्षण मोफत करावे, असे मत संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजसह सर्व घटकांना आरक्षण दिले होते. त्यांच्या कार्याची अनुकरण केले पाहिजे. मला सरकारला दोष द्यायचा नसल्याचेही संभाजीराजे म्हणाले.