'सारथी संस्थेबाबत चाललेला पोरखेळ थांबवावा' - खासदार संभाजीराजे छत्रपती बातमी
मी कोणत्या पक्षाची भूमिका मांडत नाही. सारथी संस्था ही शाहू महाराज यांच्या नावाने उभारली आहे. मात्र, सारथीची स्वायत्तता जी होती ती आज आहे का? संस्थेचा जो उद्देश आहे त्यावर संस्था चालते का, असा सवाल उपस्थित होत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
'सारथी संस्थेबाबत चाललेला पोरखेळ थांबवावा'
कोल्हापूर- सारथी संस्थेबाबत सुरू झालेल्या राजकारणावर आज खासदार संभाजीराजे अखेर संतापले. संस्थेच्या बाबत विविध मागण्यांसाठी आम्ही पुण्यात आंदोलन केले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या. मात्र त्याला १० महिने उलटले तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संस्थेबाबत चाललेला पोरखेळ थांबवावा, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. आज कोल्हापुरात ते बोलत होते.