महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजू शेट्टींची कर्जमाफीबद्दलची आकडेवारी शासनाची नाही - खासदार धैर्यशील माने - कर्जमाफीबद्दल राजू शेट्टी

सरकारने केलेली कर्जमाफी केवळ ७ ते ८ हजार कोटी रुपयांपर्यंतची असेल. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना होणार नाही, असे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले होते. त्यालाच खासदार धैर्यशील माने यांनी उत्तर दिले.

MP Dhairyasheel Mane
खासदार धैर्यशील माने

By

Published : Dec 27, 2019, 1:17 PM IST

कोल्हापूर - राजू शेट्टींची कर्जमाफीबद्दलची आकडेवारी शासनाची आकडेवारी नाही. त्यांनी सांगितलेली आकडेवारी कुठून आली माहिती नाही. मात्र, राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा फायदा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना होईल हे नक्की, असे खासदार धैर्यशील माने म्हणाले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारने केलेली कर्जमाफी केवळ ७ ते ८ हजार कोटींपर्यंतची असेल, असे म्हटले होते. त्यावर आज खासदार माने यांनी उत्तर दिले.

राजू शेट्टींची कर्जमाफीबद्दलची आकडेवारी शासनाची नाही - खासदार धैर्यशील माने

हे वाचलं का? - सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी? राजू शेट्टींचा सवाल

सध्याचे राज्य शासन संवेदनशील शासन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील संवेदनशील आहेत. त्यामुळे सरकार स्थापन होताच कर्जमाफीसारखा सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्याप्रती असणारी त्यांची संवेदना या विनाअट कर्जमाफीच्या निर्णयानंतर दिसून येत असल्याचे खासदार माने म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details