कोल्हापूर - वारणा नदीवरील कोडोली-चिकुर्डे या धरण पुलावरून आईने आपल्या दत्तक घेतलेल्या मतिमंद मुलीसह उडी घेवून आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला आहे. रेश्मा अमोल पारगावकर (वय ३६) मुलगी रुद्रा (वय ७, रा. पांडुरंग तात्या कॉलनी, कोडोली ता.पन्हाळा) असे त्यांची नाव आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. पतीचे अपघाती निधन व दत्तक मुलगी मतिमंद असल्याने आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांना मिळालेल्या लिहलेल्या चिठ्ठीमधून समजते.
आईची दत्तक मतिमंद मुलीसह वारणा नदीत उडी मारून आत्महत्या - वारणा नदी
दत्तक घेतलेल्या मतिमंद मुलीसह उडी घेवून आत्महत्या केली असून त्यांचा मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा ) हद्दीत सापडला आहे. रेश्मा अमोल पारगावकर (वय ३६) मुलगी रुद्रा (वय ७, रा. पांडुरंग तात्या कॉलनी, कोडोली ता.पन्हाळा) असे त्यांची नाव आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे. पतीचे अपघाती निधन व दत्तक मुलगी मतिमंद असल्याने आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे पोलिसांना मिळालेल्या लिहलेल्या चिठ्ठीमधून समजते.
आत्महत्येपासून रोखून घरी पाठवले -
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोडोली येथील रेश्मा व तिच्या पतीने चार महिन्याची रुद्रा ही मुलगी दत्तक घेतली होती. परंतु दहा महिन्यानंतर ती मतिमंद असल्याचे त्यांना समजले होते. तरीही त्यांनी तिचा लळा लागल्याने तिचा चांगला सांभाळ करत होते. रेश्मा ही कोडोली येथील खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. रेश्मा हीच्या पतीचे दीड दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले होते. दत्तक घेतलेली मुलगी रुद्रा ही मातीमंद व पतीचे निधन त्यामुळे ती अस्वस्थ होती. या रुद्रा मुलीसह मंगळवार 24 ऑगस्ट रोजी रात्री उशीरा वारणा नदीवर आत्महत्या करायला गेल्या होत्या. तिथे असणाऱ्या मच्छीमार व अन्य एका तरुणाने त्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून परतही पाठवले होते अशी माहिती आहे. त्यानंतर रात्री उशिरा तिने मुलीसह नदी पत्रात उडी घेतल्याचे काही नागरिकांनी बघितले त्यांनी ही बाब कोडोली पोलिसांना कळवली असता अंधार असल्याने त्यांना शोधता आले नाही. आज सकाळी घटनास्थळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश काशीद, फौजदार नरेंद्र पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव व कर्मचारी तलाठी अनिल पोवार आपत्ती व्यवस्थेत मदत करणारे तरूण यांच्या सयुक्तपणे कोडोली ग्रामपंचायतीच्या आपत्कालीन बोटीने शोध घेण्याचे काम सुरू केले. शोध घेतल्यानंतर सकाळी आई रेश्मा हिचा तर तर दुपारी चारच्या सुमारास मुलगी रुद्रा हीच मृतदेह नदीपात्रात ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) हद्दीत सापडला.