कोल्हापूर -इचलकरंजी येथे घरगुती वादातून आई सुजाता केटकाळे आणि तिची मुलगी साक्षी सुजाता केटकाळे यांनी लोखंडी गजाने मारहाण करून वडिलांची हत्या केल्याची घटना काल (मंगळवारी) रात्री उशिरा घडली. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय 40, रा. बर्गे मळा) असे मृताचे नाव आहे. मृत शांतिनाथ केटकाळे यांचे भाऊ महावीर केटकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघींविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अटकही करण्यात आले आहे.
- हत्या करून दोघीही पोलीस ठाण्यात हजर
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील बर्गे मळा परिसरात शांतिनाथ केटकाळे कुटुंबासह राहत होते. त्यांना तीन मुली आहेत. ते शेती काम करत तसेच त्यांच्या घरा जवळ दुकानही होते. काल मंगळवारी रात्री उशीरा शांतीनाथ, त्यांची मुलगी साक्षी आणि पत्नी सुजाता त्यांच्यात वाद झाला. यावेळी त्यांच्या इतर दोन लहान मुली सुद्धा घरातच होत्या.
या वादात मुलगी साक्षी आणि आई सुजाताने शांतिनाथ केटकाळे यांचा डोक्यात लोकांडी गज आणि बॅटने मारून निर्घृणपणे हत्या केली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या शांतीनाथ यांना तिथेच घरामध्ये सोडून दोघींनी सुद्धा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोन्ही लहान मुलींनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. शांतीनाथ यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
- 'दोघींच्या अनैतिक संबंधाची माहिती वडिलांना मिळाल्यानेच हत्या'