कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज (दि. 8 एप्रिल) दिवसभरात 167 नवे रुग्ण तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 89 जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 540 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 440 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 440 वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी, 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 540 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 800 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे