महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कळंबा कारागृहात पुन्हा सापडले दोन मोबाईल

कळंबा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी (दि. 5 फेब्रुवारी) दोन मोबाईल चार बॅटऱ्या सापडल्या आहेत. इतकी कडक सुरक्षा असतानाही मोबाईल कारागृहात जातात कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

कळंबा कारागृह
कळंबा कारागृह

By

Published : Feb 6, 2020, 11:02 AM IST

कोल्हापूर- कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा मोबाईल सापडल्याचा प्रकार घडला. यापूर्वी काही दिवसांपूर्वी मोबाईल आणि बॅटरी सापडल्या होत्या. आता पुन्हा एकदा कारागृहात 2 मोबाईल आणि 4 बॅटऱ्या सुद्धा सापडल्या आहेत.

कारागृहाचे अधिकारी ट्रेनिंग पूर्ण करून परत आलेले शरद शेळके यांनी बुधवारी (दि. 5 फेब्रुवारी) कारागृहाची झडती घेतली. यावेळी त्यांना आठ नंबर सर्कल या ठिकाणी हे मोबाईल आणि बॅटरी मिळून आले आहेत. याबाबत त्यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कान उघाडणी केली. शिवाय याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. कारागृहात वारंवार असे प्रकार होत असतील तर इतकी कडक सुरक्षा असतानाही मोबाईल कारागृहात जातात कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा - गेल्या 5 वर्षात शासन जनतेला भेटले आहे, असे मला वाटत नाही : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details