कोल्हापूर -गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुरामुळे पूरग्रस्त नागरीकांकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 24 ऑगस्टपर्यंत जमाव बंदी आदेश जारी केला असल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 24 ऑगस्टपर्यंत जमाव बंदी आदेश जारी - महाराष्ट्र पोलिस अधिनियम
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात उद्भवलेल्या महापुरामुळे पूरग्रस्त नागरीकांकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याने 24 ऑगस्ट पर्यंत जमाव बंदी आदेश जारी करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2019 रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात आली आहे. बकरी ईद स्वातंत्र्य दिन आणि 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी आदी सणांचे औचित्य साधून अनेक प्रकारची आंदोलने होण्याची शक्यता व्यक्त करण्याच आली आहे. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.