महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापुरात मनसेचे खड्ड्यांना हार घालून आंदोलन

खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने खड्ड्यांना हार घालत अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी पन्हाळा तालुका मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

MNS agitation for bad roads, kolhapur
मनसे आंदोलन बातमी, पन्हाळा

By

Published : Nov 6, 2020, 7:06 PM IST

कोल्हापूर -खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आता पन्हाळा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येथील महत्वाची बाजारपेठ असलेल्या कोतोली ते कोलोली दरम्यानचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून धोकादायक बनला आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. याचा निषेध करण्यासाठी आज मनसेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन बातमी, पन्हाळा

पन्हाळा तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी आणि हार घालत आंदोलन केले. तसेच रस्ता खराब असल्यामुळे या मार्गावर अनेकवेळा छोट्या - मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चौकात अपघाताचे चित्र लावून मनसेकडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना खड्ड्याला हार घालायला लावला. तातडीने रस्ता खड्डेमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details