कोल्हापूर :भाजप शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा ही काढून घेतली (Shinde government withdrawing security) आहे. यामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिक्रिया येत असून जोपर्यंत जनता आमच्या सोबत आहे, तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही. असे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी म्हटले (MLA Satej Patil criticizes Shinde government) आहे. तसेच सरकारने घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
नेत्यांची सुरक्षा काढली :राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन गोष्टी घडत असून आज राज्य सरकारने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा अचानकपणे ही काढली आहे. याबाबत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, गृहराज्यमंत्री असल्याने आम्हाला ती सुरक्षा देण्यात आली होती. मात्र एसआयटीने दिलेल्या अहवालानुसार खरंच या नेत्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे का नाही, या अहवालानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे का ? हे पाहणेही गरजेचे असल्याचे सतेज पाटील म्हणाले आहेत. नेत्यांना जी सुरक्षा पुरवली जाते, ती सत्ताधारी आणि विरोधक म्हणून नाही, तर त्या नेत्याला असलेला धोका पाहून सुरक्षा देण्यात येत असते. मात्र आज काढून घेण्यात आलेल्या सुरक्षेला कुठेतरी राजकीय वास येत असल्याची शंका सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत जनता आमच्यासोबत आहे तोपर्यंत आम्हाला सिक्युरिटी घेऊन फिरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले (MLA Satej Patil on withdrawing security) आहेत.