कोल्हापूर- सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मराठा समजाला न्याय द्या, आमदार प्रकाश आबिटकरांची मुख्यमंत्र्याकडे मागणी - कोल्हापूर शहर बातमी
मराठा आरक्षणाबाबत राधानगरी-आजरा-भुदरगड विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावर विरोधी पक्ष, तज्ज्ञ वकील यांच्याशी चर्चा सुरू असून, याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितल्याची माहिती आमदार आबिटकर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-आजरा-भुदरगड विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात मिळाल्यानंतर समाजात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक तरुणाचे भवितव्य धोक्यात आले आहे. ही स्थगिती उठवण्याबाब राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार आबिटकर यांनी केली.
त्यावर मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्याबाबत चर्चा सुरू आहे. विरोधी पक्ष, तज्ज्ञ वकील यांच्याशी चर्चा सुरू असून, याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
हेही वाचा -कोल्हापुरात नाही पेट्रोल-डिझेल विक्रीत अनियमितता!