महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hasan Mushrif On Kolhapur Visit: मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात पहिल्यांदाच येणार, समरजीत राजेंना काय देणार उत्तर? - MLA Hasan Mushrif

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज कोल्हापुरात पहिल्यांदाच येणार आहेत. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे समरजीत सिंह घाटगे हे नाराज आहेत. समरजीत सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर विरोधक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी समरजीत सिंह घाटगे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

Hasan Mushrif On Kolhapur Visit
हसन मुश्रीफ कोल्हापूर दौऱ्यावर

By

Published : Jul 7, 2023, 8:01 AM IST

Updated : Jul 7, 2023, 8:14 AM IST

कोल्हापूर : एक वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये झालेला बंड हा आता राष्ट्रवादीमध्ये देखील झाला आहे. रविवारी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह आठ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आणि भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी सत्ता राज्यात स्थापन झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून मोठा शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आल. दरम्यान या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर मंत्रीपदाची शपथ घेतलेले आमदार हसन मुश्रीफ हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांची स्वागताची जय्यत तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान ते उद्या त्यांच्या मतदार संघ असलेल्या कागल येथे कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत.

मंत्री पदाची शपथेनंतर कोल्हापुरात पहिल्यांदाच :महाविकास आघाडीमध्ये ग्राम विकास मंत्री आणि कामगार मंत्री असलेले आमदार हसन मुश्रीफ हे सलग पाच वेळा कागल मतदार संघातून निवडून आलेले आमदार आहेत. त्यांची या मतदारसंघात मोठी ताकद आहेत. ते शरद पवार यांचे निष्ठावंत मानले जायचे. त्यांच्याकडे सध्या गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्हा बँकेचे सत्तेच्या चाव्या आहेत. तर मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक असलेले भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी देखील 2024 च्या निवडणुकीच्या विजयासाठी चांगलेच कंबर कसली आहे. दरम्यानच्या काळात हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला होता. त्यांच्या घरावर दोन वेळा आणि जिल्हा बँकेत एकदा अशी ईडीची रेड देखील पडली होती. तर भाजपकडून त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देखील देण्यात आली होती. मात्र साहेब एक्के साहेब म्हणणारे मुश्रीफ ईडीच्या दलदलीत अडकल्याने शरद पवारांचा हात सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले.

हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद :राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटी नंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या मागील ईडीची पीडा देखील संपुष्टात येणार आहे. पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाल्याने मतदार संघात त्यांचे वजन आणखी वाढले आहे. दरम्यान आमदार हसन मुश्रीफ हे मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्या कोल्हापुरात पहिल्यांदाच येत आहेत, यामुळे कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. कागलसह कोल्हापूर शहरात त्यांच्या स्वागताचे आणि अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तर ढोल ताशाच्या गजरात आणि हलगीच्या निनादात गुलाल उधळत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.


'असा' असेल दौरा :मंत्री हसन मुश्रीफ हे आज सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी चौकात येणार आहेत. येथे त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ते दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नर्सरी बागेतील समाधी स्थळाला अभिवादन करणार आहेत. तर पुढे साडेबारा वाजता करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेत आशीर्वाद घेणार आहेत. पुढे कागलकडे रवाना होणार आहेत. येथे गैबी दर्ग्याचे दर्शन घेऊन फुले आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत, तर येथेच त्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम पार पडणार आहे. येथेच ते कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत. पुढील तीन दिवस ते कोल्हापुरात राहणारा असून कार्यकर्त्यांशी गाठीभेटी देखील ते घेणार आहेत.


समरजीत राजेंच्या टीकेला उत्तर :दरम्यान हसन मुश्रीफ मंत्रीपदाची शपथ घेतल्याने नाराज झालेले त्यांचे कट्टर विरोधक समरजीत सिंह घाटगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली, तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील तुम्ही निवडणुकीची तयारी सुरू करा. तुमच्या आडवे कोण आले, तर त्याला कसं परतवून लावायचे हे आपल्याला माहित आहे असे म्हणाले. ते कोल्हापुरात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत 2024 च्या निवडणुकीत आपणच उमेदवार असणार आणि मोठ्या मार्जिनने निवडून येणार असे म्हणत आज या मेळाव्यातून विजयाची पताका रोवत आहे. हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. तसेच त्यांच्यावर माझ्या अंगातील शेवटचा रक्ताचा थेंब जोपर्यंत आहे, तोपर्यंत मी गुरूची साथ सोडणार नाही म्हणणारे मुश्रीफांनी गुरुच बदलला अशी खोचक टीका देखील त्यांच्यावर केली आहे. यामुळे त्यांच्या या टीकेला हसन मुश्रीफ काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

  1. 2024 ची विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार - समरजित घाटगे
  2. Maharashtra Politics : कोल्हापूर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण, मंडलिक मुश्रीफ महाडिक यांचा असणार 'एम' फॅक्टर
  3. Political Crisis : हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने समरजीतसिंह घाटगे नाराज; फडणवीसांची घेतली भेट
Last Updated : Jul 7, 2023, 8:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details