कोल्हापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे भाषण केले नाही, त्यांनी शिमग्याचे भाषण केले. इतर प्रश्नांवर न बोलता केवळ भाजप हाच मुद्दा घेऊन ते विरोधकांना शिव्या-शाप देण्याची भाषा करत होते, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी टीका केली
पाटील म्हणाले, भाजपची केवळ एकच भूमिका राहिली आहे. 'हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही'. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचे ढोंग करत आहे, हे जनतेला समजत आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते जनता दाखवून देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा काय होती, हे त्यांनी विचार केला पाहीजे. दसरा मेळाव्यात जनतेच्या प्रश्नावर ते बोलले नाही. पण, भाषणाचा मुद्दा फक्त भाजप होता. हे त्यांनी दाखवून दिले, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली नाही, मग इतर मुख्यमंत्री का राखतील, असा सवाल देखील पाटील यांनी केला. काय म्हणाले होते दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी देखील दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाषण केले. हा कार्यक्रम नागपूर येथे झाला. त्यात त्यांनी हिंदुत्व काय आहे ते समजून सांगितले आहे. आमच्यावर हिंदुत्वाच्या नावाने प्रश्न उपस्थित करणाऱ्या आरएसएसच्या राजकीय शाखेने भागवत यांनी जे हिंदुत्व सांगितले तेच हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचेही आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालत असल्याने आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपने हिंदुत्व समजून घ्यावे, असे ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा -पन्हाळ्यात शिक्षकाला दमदाटी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल