कोल्हापूर- गतवर्षी झालेल्या टाळेबंदीत राज्य सरकारने कामगारांना कवडीची मदत दिली नाही. मुश्रीफ यांनी, कामगारांचे डोळे विस्फारुन जातील असे पॅकेज देऊ, असे म्हणाले होते. मागील वर्षी टाळेबंदीमध्ये कामगारांना कवडी मिळाली नाही, मग आता काय देणार, असा सवाल भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे ते कोल्हापुरात बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना हा विषाणू लवकर संपणार नाही. लोकांची काळजी घेऊन जनजीवन सुरळीत ठेवले पाहिजे. प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांना आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे. असंघटीत कामगारांना काहीच पॅकेज वर्षभरात दिले गेले नाही. महिनाभर टाळेबंदी करणार असाल तर सर्वसामान्यांना किराणा साहित्य व भाजी मोफत देणार असल्याची घोषणा करा. जर याची व्यवस्था न करता टाळेबंदी करणार असाल तर आम्हाला टाळेबंदी मान्य नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.