महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satej Patil Vs Chandrakant Patil : सतेज पाटलांची 'मिसळ पे चर्चा' तर चंद्रकांत पाटलांची 'चाय पे चर्चा'; कोल्हापुरातील राजकिय वातावरण तापलं - सतेज पाटलांची 'मिसळ पे चर्चा'

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोट निवडणुकीत ( Kolhapur North Assembly Byelection ) महाविकास आघाडी विरोधात भाजप मध्ये 'कांटे की टक्कर' होत आहे. इथे पालकमंत्री सतेज पाटील ( Guardian Minister Satej Patil ) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) दोघांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोघांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

Satej Patil Vs Chandrant Patil
कोल्हापुरातील राजकिय वातावरण तापलं

By

Published : Mar 28, 2022, 6:51 PM IST

Updated : Mar 28, 2022, 7:21 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोट निवडणुकीत ( Kolhapur North Assembly Byelection ) महाविकास आघाडी विरोधात भाजप मध्ये 'कांटे की टक्कर' होत आहे. इथे पालकमंत्री सतेज पाटील ( Guardian Minister Satej Patil ) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Chandrakant Patil ) दोघांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोघांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. पालकमंत्री सतेज पाटील तर पायाला भिंगरी बांधून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा प्रचार करत आहेत. तर चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी जोर धरला आहे. सतेज पाटील दररोज 'मिसळ पे चर्चा' करत लोकांशी संवाद साधत आहेत. तर तिकडे चंद्रकांत पाटलांनी सुद्धा 'चाय पे चर्चा' सुरू केली आहे. त्यामुळे याची शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.

चहा, मिसळ आणि राजकारण

जाधव-कदमांच्या लढाईत दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला -

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीमध्ये महाविकास आघाडी विरोधात भाजप असा सामना होत आहे. भाजपकडून सत्यजित कदम जे महाडिक परिवारातील आहेत तर काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव आहेत. या दोघांमध्ये लढत होत असली तरी खरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती म्हणजे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची. सुरुवातीला महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी निवडुन होईल बोलले जात होते. मात्र, चंद्रकांत पाटलांनी थेट मैदानात उतरत भाजपकडून सर्व ताकद वापरली जाणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय दररोज दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडून आणण्यावरून सुरू झालेले राजकारण आता प्रत्यक्ष लढाईपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी प्रचारासाठी आपला संपूर्ण वेळ दिला आहे.

हेही वाचा -Kolhapur By Election : 'चंद्रकांत पाटील काय बोलतात हे बघायचं लोक...'; राजेश क्षीरसागरांचा टोला

दररोज 'मिसळ' आणि 'चाय' पे चर्चा सुरू -

पालकमंत्री सतेज पाटील गेल्या 4 दिवसांपासून दररोज सकाळी मतदारसंघातील विविध भागात जाऊन मिसळ पे चर्चाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. महाडिक सुद्धा विविध भागात जाऊन रॅली काढत आहेत. चंद्रकांत पाटील सुद्धा चाय पे चर्चाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. येत्या 12 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर 16 एप्रिल रोजी मतमोजणी असणार आहे. त्यामुळे नागरिक नेमकी कोणाला साथ देणार हेच पाहावे लागणार आहे.

Last Updated : Mar 28, 2022, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details