महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहराज्यमंत्र्यांनी केला 'त्या' बहादुर पोलिसांचा सत्कार ; जाहीर केले 'आगळे-वेगळे बक्षीस'

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी राजस्थानच्या एका टोळीला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्या सर्व पोलिसांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्कार केला.

Satej Patil honored Kolhapur police
सतेज पाटील यांनी कोल्हापूर पोलिसांचा सत्कार केला

By

Published : Feb 1, 2020, 9:21 PM IST

कोल्हापूर - काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने राजस्थानमधील विष्णोई टोळीला जेरबंद केले होते. आपला जीव धोक्यात घालून टोळीला जेरबंद करणाऱ्या त्या सर्व बहादुर पोलिसांचा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सत्कार केला. विशेष म्हणजे त्यांना बक्षीस म्हणून आपले एक महिन्याचे वेतन देऊ केले आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला कोल्हापूर पोलिसांचा सत्कार...

हेही वाचा... 'जुन्याच योजना नव्या नावाने पुढे आणणारा फसवा अर्थसंकल्प'

कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून टोळीतील गुंडांचा गोळीबार अंगावर झेलला होता आणि त्यांना पकडले होते. म्हणूनच या सगळ्या कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी त्यांचा सत्कार केला. कोल्हापूरमधील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रम प्रसंगी मंत्री सतेज पाटील यांनी ज्या पोलिस दलाने त्या टोळीला पकडले त्यांना बक्षीस म्हणून आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा... केंद्रीय अर्थसंकल्प 2020: 'अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली'

ABOUT THE AUTHOR

...view details