कोल्हापूर - आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक सरकारने दिलेल्या वागणुकीचा जयसिंगपूरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनी कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
राज्यमंत्री यड्रावकर समर्थक आक्रमक; रास्ता रोको करत केला कर्नाटक सरकारचा निषेध
सिमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यड्रावकर बेळगांवला गेले होते. यावेळी त्यांना पोलिसांकडून चुकीची वागणूक देत धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल यड्रावकर यांनीही कर्नाटक सरकारचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
राज्यमंत्री यड्रावकर समर्थक आक्रमक
हेही वाचा -कर्नाटकची दडपशाही.. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात