कोल्हापूर: आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांची 149 वी जयंती आहे. जिल्ह्यात महाराजांची जयंती जोरदार पद्धतीने साजरी केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी केली. छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जात होते. त्यांचे सामाजिक क्रांतीचे विचार तर होतेच मात्र सर्वांगीण विकासाची जे विचार होते. यामुळे त्यांनी सर्व समाजातील मुलांना शिक्षण भेटावे, यासाठी समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली शाळा सुरू केल्याने त्यांनी राधानगरी धरण उभे केले यामुळे शेतीमध्ये क्रांती निर्माण झाली. अनेक ठिकाणी त्यांनी बाजारपेठा बसवल्या आणि त्यांचा हा गौरव जगापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, असे म्हणत पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.
शाहू महाराजांची जयंती साजरी : केसरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे दिपक केसरकर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांची 149 वी जयंती साजरी केली. केसरकरांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेतस पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हाच शाहू महाराजांच्या विचारांचा विजय: सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे. महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. शाहू महाराजांनी कोल्हापूरचा विकास झाला, पाहिजे यासाठी अनेक क्रांती घडवून आणले. त्यांनी पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी राधानगरी धरण बांधले तसेच समाजातील प्रत्येकाला शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रत्येक समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी केली. कोल्हापूरचा व्यापाराचा प्रश्न मिटवा यासाठी बाजारपेठा उभा केल्या. हे सर्व करत असताना त्यांनी संस्कृती ही जपली कोल्हापूरची कुस्तीच्या कलेला त्यांनी प्रोत्साहन दिले.