कोल्हापूर: पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापुरातील फिरते वाचनालय सुरू करण्यात आली आहे. या वाचनालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी त्यांनी पुस्तकाचे महत्व सांगत पुस्तक अधिक वाचा कारण वाचल्याशिवाय जगात काय सुरू आहे, कळणार नाही. Minister Chandrakant Patil News मात्र वाचताना ते नीट वाचा नाहीतर म्हणताना एक म्हणतो, आणि अर्थ वेगळाच काढतो असं होऊ देऊ नका. समजलं नाही तर Minister Chandrakant Patil News 2-2 वेळा वाचा. मात्र करू 'ध' च 'म' करू नका, असा सल्ला त्यांनी वाचकांना दिला आहे.
या संकल्पनेचे उद्घाटन:पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यासाठी गेल्या वर्षभरापासून पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने फिरते ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. तर हीच संकल्पना घेत पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापुरात देखील फिरते, ग्रंथालय चंद्रकांत दादांनी Chandrakant Patil News सुरू केले आहे. या ग्रंथालयात तब्बल 6 हजार पुस्तके असणार आहेत. हे ग्रंथालय दररोज एका भागात जाऊन विना पैसे मोफत वाचण्यासाठी दिले जाणार आहे. या संकल्पनेचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरातील दसरा चौकात पार पडला आहे.
चंद्रकांत पाटलांचा सल्ला: यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाचकांना पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले आहे. सोबतच गेल्या अनेक वर्ष पुस्तक वाचले जातात, मात्र सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलवर ही पुस्तके आले आहेत. मात्र तरीही आम्ही जुनी माणसं असल्याने आम्हाला मोबाईलपेक्षा प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यास चांगलं वाटतं, असे म्हणत पुस्तक अधिक वाचा कारण वाचल्याशिवाय जगात काय सुरू आहे कळणार नाही. मात्र वाचताना ते नीट वाचा नाहीतर म्हणताना एक म्हणतो आणि अर्थ वेगळाच काढतो, असे होऊ देऊ नका. समजलं नाही तर 2- 2 वेळा वाचा मात्र करू 'ध च म' करू नका असा सल्ला त्यांनी वाचकांना दिला आहे. दरम्यान आज ग्रामपंचायत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने चंद्रकांत दादा स्वतः निवडणूक प्रचारात उतरले असून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ते आज प्रचारासाठी जात आहेत.
6 हजार पुस्तके असणार:पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वतीने फिरते ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे, तर हीच संकल्पना घेत पुण्याच्या धर्तीवर आता कोल्हापुरात देखील फिरते ग्रंथालय चंद्रकांत दादांनी सुरू केले असून या ग्रंथालयात तब्बल 6 हजार पुस्तके असणार आहेत. हे ग्रंथालय दररोज एका भागात जाऊन विना पैसे मोफत वाचण्यासाठी दिले जाणार आहे. या संकल्पनेचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरातील दसरा चौकात पार पडला.