कोल्हापूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाकडून श्रमिक विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. अशीच एक रेल्वे सोमवारी (दि. 11 मे) कोल्हापुरातून मध्यप्रदेश येथील जबलपूरला जाण्याठी सोडण्यात आली. यावेळी उपस्थित प्रवाशांशी बातचीत केले असता आम्हाला खूप आनंद होत आहे. शासनाने एक पैसाही न घेता आमच्यासाठी तिकीट आणि खाण्यापिण्याची सोय केली. यामुळे महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातून मंगळवारी (दि. 11मे) सायंकाळी पाच वाजता मध्यप्रदेश येथील जबलपूरकडे श्रमिक विशेष रेल्वे रवाना झाली. या रेल्वेने सुमारे बाराशे आपल्या गावी, आपल्या घराकडे निघाले आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे आदींच्या उपस्थितीत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.