महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ganeshotsav 2022: कोल्हापूरात सामाजिक ऐक्याचा संदेश; येशूंच्या भळभळत्या जखमांवर गणेशाकडून प्रेमाची फुंकर - येशूंच्या जखमांवर गणेशाकडून प्रेमाची फुंकर

येशू ख्रिस्तांना श्रीकृष्णाच्या रूपातील गणेश मलमपट्टी करत असल्याचा देखावा कोल्हापुरातल्या मंगळवार पेठ ( Kolhapur Mangalwar Peth ) येथील राधाकृष्ण भक्त मंडळाने ( Radhakrishna Bhakta Mandal Kolhapur ) यावर्षी साकारला आहे. तर या मूर्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा या मंडळाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.

Jesus Christ
येशू ख्रिस्त

By

Published : Sep 7, 2022, 5:48 PM IST

कोल्हापूर : पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यात गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022 ) काळात नेहमीच काहीतरी खास आणि सामाजिक संदेश देणारे देखावे पाहायला मिळतात. यावर्षी सुद्धा कोल्हापुरातल्या मंगळवार पेठ ( Kolhapur Mangalwar Peth ) येथील राधाकृष्ण भक्त मंडळाने ( Radhakrishna Bhakta Mandal Kolhapur ) एक सुंदर गणेशमूर्तीद्वारे सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे. यामध्ये येशू ख्रिस्तांना श्रीकृष्णाच्या रूपातील गणेशा ( Ganesha in the form of Krishna ) मलमपट्टी करत असताना दाखविण्यात आले आहे. या मूर्तीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून ख्रिस्ती बांधवांनी सुद्धा मंडळाच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आहे.




सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी रेखाटलेल्या चित्राचा आधार घेऊन गणेशमूर्ती साकारली : कोल्हापूरातील मंगळवार पेठ येथे गेल्या 25 वर्षांपासून राधाकृष्ण भक्त मंडळाकडून विविध सुंदर गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. यावर्षी रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा करत असताना काहीतरी सामाजिक संदेश देणारी आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी गणेशमूर्ती असावी असा मानस होता. त्यानुसार सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी रेखाटलेल्या एका चित्राचा आधार घेऊन सुंदर गणेशमूर्ती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंडळातील सर्वच सदस्यांनी तशी मूर्ती बनवून घेतली. यामध्ये श्रीकृष्ण क्रूसवरील येशू ख्रिस्तांना मलमपटी करत असून प्रेम, दया, शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या येशूंच्या भळभळत्या जखमांवर प्रेमाची फुंकर घालत आहे. याच कलाकृतीचा आधार घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर शहराच्या पुरोगामी विचारांना पाईक राहून राधाकृष्ण भक्तमंडळाने यावर्षीची गणेशाची मूर्ती साकारली आहे. या कलाकृती मधून धार्मिक व सामाजिक ऐक्याचा, धर्मनिरपेक्ष मूल्य जपण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळांनी केला आहे. अशी माहिती मंडळाचे प्रसाद शेडे यांनी दिली.

येशूंच्या भळभळत्या जखमांवर गणेशाकडून प्रेमाची फुंकर,कोल्हापूरातील गणेश मंडळाकडून सामाजिक ऐक्याचा संदेश



आज विधवा महिलांच्या हस्ते गणेशाची महाआरती :दरम्यान, संपूर्ण देशाला ज्या कोल्हापूर जिल्ह्याने एक विधवा महिलांसाठी विधवा प्रथा बंदी घालून एक सन्मान प्राप्त करून दिला, ( Ganeshas Maha Aarti performed by widow women ) त्याच जिल्ह्यात प्रत्यक्षात सुद्धा महिलांना सन्मान प्राप्त करून दिला जात आहे. आज याच मंडळाने महाआरतीचा मान विधवा महिलांना दिला आहे. समाजात त्यांना सुद्धा प्रत्येक समारंभात तसेच पूजेमध्ये, विधीमध्ये मान मिळाला पाहिजे असा संदेश त्यांनी याद्वारे दिला आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details