महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हलगर्जीपणाने लहान मुलांच्या उपचारासंबधी मॅसेज व्हायरल करू नये' - कोल्हापूर शहर बातमी

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुकाबला करण्यासाठी उपायोजनेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि इतर शैक्षणिक शिक्षकांची संवाद साधला. जिल्ह्यात या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सध्या 150 ऑक्सीजन बेड तयार करण्यात आले असून 18 वर्षाखालील को-मॉरबीड विद्यार्थ्यांची यादी संबंधित आठ दिवसांनी तयार करावी, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.

सतेज पाटील
सतेज पाटील

By

Published : May 30, 2021, 3:03 PM IST

Updated : May 30, 2021, 4:59 PM IST

कोल्हापूर - संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे अंदाज आहेत. या लाटेचा मुकाबला प्रभावीपणे आणि एकत्रितपणे करण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि इतर माध्यमातील शिक्षकांनी 'माझा विद्यार्थी माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबवावी. तसेच हलगर्जीपणाने लहान मुलांच्या उपचारा संबंधीचे वैयक्तिक मेसेज कोणीही व्हायरल करू नयेत. टास्क फोर्सच्या माध्यमातून ज्या उपचाराच्या नियमावली जाहीर होतील त्या माध्यमातूनच लहान मुलांवर उपचार केले जातील, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. आज (दि. 30 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना पालकमंत्री

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मुकाबला करण्यासाठी उपायोजनेबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि इतर शैक्षणिक शिक्षकांची संवाद साधला. जिल्ह्यात या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्राथमिक स्तरावर सध्या 150 ऑक्सीजन बेड तयार करण्यात आले असून 18 वर्षाखालील को-मॉरबीड विद्यार्थ्यांची यादी संबंधित आठ दिवसांनी तयार करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या आहेत. लहान मुलांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांनी किमान रोज एक तास समुपदेशन करावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिली आहे. तसेच 'माजी विद्यार्थी माझी जबाबदारी' ही संकल्पना शिक्षकांनी राबवून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवावे. पालकांनीही जबाबदारीने वागून तसेच शिक्षकांनी ही स्वतःची काळजी घ्यावी. या लाटेत लहान मुलांची त्याचबरोबर विद्यार्थ्यांची कशा पद्धतीने काळजी घेता येईल, यासाठी येत्या चार दिवसात प्रोटोकॉल तयार केले जातील, असेही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले आहेत.

दरम्यान, लहान मुलांच्या बाबतीत उपचार करताना काळजी घेतली पाहिजे. कोणीही हलगर्जीपणाने त्यांच्यावर उपचार कसे करावेत, असे वैयक्तिक मेसेज व्हॉट्सअ‌ॅप, ट्विटरवर व्हायरल करू नयेत. टास्क फोर्स ज्या पद्धतीने उपचाराच्या सूचना देतील, त्याचीच अंमलबजावणी केली जाईल. त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन दिले जाईल. वैयक्तिक मेसेज व्हायरल करणे टाळावे, अशा सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या आहेत.

महापुराचा धोका टाळण्यासाठी उद्या बैठक

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा संभाव्य धोका ओळखून उद्या (31 मे) जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तीन जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागातील अधिकारी व्हीसीद्वारे संपर्क साधणार आहेत. धरणातील पाणीसाठा, पाण्याचे नियोजन आणि महापूर येऊ नये यासाठी उपाययोजनेवर चर्चा करणार आहेत, अशी माहितीही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. तसेच कोल्हापुरातील महापुराचा धोका टाळण्यासाठी आतापासूनच धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागातून सुरू आहे, अशी माहितीही पालकमंत्री पाटील यांनी दिली.

हेही वाचा -मराठा आरक्षण : समरजित घाटगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात; गावागावात बैठकांचे सत्र सुरू

Last Updated : May 30, 2021, 4:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details