कोल्हापूर -जिल्ह्यात आज आणखी 41 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात एका रुग्णाची वाढ झाली आहे. कोल्हापुरातील एकूण रुग्णांची संख्या 693 वर गेली असली तरी त्यातील 571 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत कोल्हापुरात 114 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर कोरोनामुक्तीच्या दिशेने; 693 मधील 571 रुग्णांनी केली कोरोनावर मात - कोल्हापूर कोरोना घडामोडी
कोल्हापुरातील एकूण रुग्णांची संख्या 693 वर गेली असली तरी त्यातील 571 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत कोल्हापुरात 114 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज दिवसभरात एकूण 73 जणांच्या स्वॅबचे अहवाल सीपीआर प्रशासनाकडे प्राप्त झाले. त्यातील 71 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर एक पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. उरलेल्या एकाचा अहवाल नाकारण्यात (रिजेक्ट) आला आहे. जिल्ह्यातील एकूण 693 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यात (175) आहेत. तर सर्वात कमी गगनबावडा तालुक्यामध्ये (6) रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातील रुग्णांची संख्या 24 इतकी आहे.
एकूण रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यामध्ये 21 ते 50 वयोगटातील रुग्णांची सर्वाधिक 461 संख्या आहे. यामध्ये वयोगटानुसार जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षांपेक्षा लहान - 1
1 ते 10 वर्ष - 56
11 ते 20 वर्ष - 86
21 ते 50 वर्ष - 461
51 ते 70 वर्ष - 84
71 वर्षांवरील - 5
एकूण - 693
मयत - 8
डिस्चार्ज - 571
अॅक्टिव्ह - 114