महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation Bandh : जालना घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर बंदची हाक; गृहमंत्री फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज (ता. ५) कोल्हापूर बंदची (Kolhapur Bandh) हाक दिली आहे.

Maratha Reservation
कोल्हापूर बंदला सुरुवात

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 1:07 PM IST

माहिती देताना प्रतिनिधी

कोल्हापूरMaratha Reservation :आज सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूर बंदची हाक (Kolhapur Bandh) देण्यात आली आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. व्यापाऱ्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतल्याने लक्ष्मीपुरी व्यापारी पेठेत (Laxmipuri Market) स्मशान शांतता होती.

देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा: सकल मराठा समाजाच्या वतीने जालना घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद करण्याचं आवाहन सोमवारी करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासूनच कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसर, धान्य लाईन, व्यापारी लाईन, शाहूपुरी व्यापारी पेठ, गुजरी परिसरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे शहरात शुकशुकाट जाणवला. सकाळी दहा वाजता सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते दसरा चौकात एकत्र जमले. त्यांनी या जालना घटनेचा निषेध करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावेळी गृहमंत्री फडणवीस यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली.



प्रवासी वाहतूक बंद: कोल्हापुरातून कोकण आणि गोवा तसंच कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कोल्हापुरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात बाहेरगावी जाणारे अनेक प्रवासी अडकले आहेत. सकाळपासून एकही बस स्थानक परिसरातून बाहेर पडली नाही. परिणामी ग्रामीण भागातील परिवहन यंत्रणाही कोलमडली आहे.



स्थानिक शाळांना सुट्टी: कोल्हापूर बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये यासाठी, शहरातील प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या परिसरातही शांतता जाणवत होती. जिल्ह्यातील हुपरीसह पट्टणकोडोली गाव ही आज बंद ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे रंकाळा-हुपरी, रंकाळा-कागल या मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.


जिल्हा पोलीस दल सज्ज: शहरात येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंद दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दसरा चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलद कृती दल तसंच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या कोल्हापुरात दाखल झाल्या होत्या.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र मिळणार? हैदराबादच्या निजामांचं रेकॉर्ड तपासणार
  2. Maratha Reservation : विजय वडेट्टीवार म्हणजे ओबीसी समाज नाही; आरक्षण मुद्द्यावरून ओबीसी आक्रमक
  3. Maratha Reservation Live Updates : फडणवीस यांच एवढं तोकडे ज्ञान असेल असं वाटल नव्हतं- उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details