कोल्हापूर -मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज (14 जून) कोल्हापूरचा दौरा केला. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडले. हा सगळा प्रकार सावित्रीबाई फुले परिसरातील जिजाऊ फाऊंडेशनच्या कार्यालयात घडला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या दरवाजावर हातांनी बडवून पोलिसांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले. यावेळी कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. दरम्यान, रस्त्यावरती बसून कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
'मराठा समाजाच्या 2145 विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्तीपत्र द्या'