कोल्हापूर- मराठा समाजाला डावलून सुरू असलेल्या वीज कंपनीमधील भरतीला विरोध करत सकल मराठा समाजाकडून आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता आंदोलकांनी भरती तात्काळ थांबवा, अशी मागणी केली. संतप्त अधिकाऱ्यांच्या अंगावर फाईल फेकून मारल्या.
मराठा आंदोलक निवेदन देण्यासाठी गेले असता वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना फोन लावण्यास दिरंगाई केली. यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी येथील अधिकाऱ्यांच्या अंगावर फाईल आणि निवेदन फेकले. आम्हाला या क्षणाला निर्णय हवा असून त्याशिवाय बाहेर पडणार नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना फोन लावून आंदोलनाची माहिती दिली.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक काय म्हटले आहे निवेदनात -महावितरण विभागात उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 1 आणि 2 डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणीचे काम आपल्या कार्यालयात होत आहे. परंतु कागदपत्रे पडताळणीमधून मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे. एसईबीसी व प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कागदपत्रे पडताळणी पूर्ण करावी. मराठा समाजातील मुलांना भरतीप्रक्रियेत डावलून समाजावर अन्याय केला जात आहे. या विरोधात समाजात प्रचंड संतापाची भावना आहे. त्यामुळे मराठा समाजावरील अन्याय थांबवावा, ही विनंती मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली.
संबंधित बातमी वाचा-महावितरणची पदभरती सुरू ठेवल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून प्रकाशगड येथे आंदोलन
आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित, मात्र...
संतप्त आंदोलकांनी भरती थांबविण्याबाबत लेखी देऊ असे सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. त्यांनी आश्वासन पाळावे,अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करायला आम्हाला भाग पाडू नका, असा इशाराही आंदोलकांनी महावितरणला दिला. यावेळी काही काळ कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भरती प्रक्रिया थांबविण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
संबंधित बातमी वाचा-मराठा क्रांती मोर्चाची 8 डिसेंबरला विधानभवनावर धडक; राज्यस्तरीय बैठकीत निर्णय
मुंबईतही मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
महावितरण कंपनीअंतर्गत निघालेल्या पदभरतीत एसई बीसीमधून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण द्यावे किंवा आरक्षण मिळेपर्यंत भरती थांबवावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी (1 डिसेंबर) वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन देण्यात आले. तसेच ही पदभरती थांबवा, अशी मागणी करण्यात आली होती. महावितरण कंपनी अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक या पदाकरिता जाहिरात क्र. 05 / 2019 नुसार उमेदवार निवड यादीचे प्रत्यक्ष पडताळणी दिनांक 1 व 2 डिसेंबर 2020 रोजी होणार आहे