कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाज आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन पार पडले. त्यानंतर आता मुंबई आणि पुण्याला होणारा दूधपुरवठा रोखण्यात येणार आहे. मुंबई आणि पुण्याला कोल्हापुरातून ज्या टँकरमधून दूध पुरवठा होतो, ते सर्व टँकर उद्या अडवण्यात येणार असल्याचे घोषणा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
मराठा आरक्षण : उद्या मुंबई-पुणेला होणारा दूधपुरवठा रोखणार, सकल मराठा समाज आक्रमक
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून याची सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही पद्धतीची झळ बसू नये, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचे म्हटले आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असून याची सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही पद्धतीची झळ बसू नये, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय असतानासुद्धा कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दाखवले नाही, असेही मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. त्यामुळे उद्या मुंबई आणि पुण्याला होणारा दूधपुरवठा रोखण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. शिवाय, राज्य सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न न केल्यास यापुढे याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे कोल्हापूरातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.