आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी; डीएनए चाचणी करणार - भोंदूगिरीसाठी कवटी
आजरा तालुक्यातील सुलगाव येथील तानाजी डोंगरे गावी जात असताना त्यांना येथील रामतीर्थजवळच्या विजेच्या खांबाच्याखाली माणसाची कवटी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी नागरिकांनीसुद्धा ही कवटी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
![आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी; डीएनए चाचणी करणार आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15261753-1043-15261753-1652323122909.jpg)
आजऱ्यातील रामतीर्थजवळ सापडली माणसाची कवटी
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातील रामतीर्थ येथे माणसाची कवटी आढळली आहे. चक्क माणसाची कवटी आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांनी सुद्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिसांनी या कवटीचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली आहे. शिवाय याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.