कोल्हापूर- महानगरपालिकेचे आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी संजय मोहिते यांची निवड झाली. सूरमंजिरी लाटकर यांना 43 तर भाजप-ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांना 32 मते पडली. सूरमंजिरी लाटकर कोल्हापूरच्या 49 व्या महापौर बनल्या आहेत. तर या सभागृहातील त्या सातव्या महापौर बनल्या आहेत.
सुरमंजिरी लाटकर कोल्हापूरच्या नव्या महापौर, तर उपमहापौरपदी संजय मोहिते - manjiri latkar
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुरमंजिरी लाटकर यांची तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या संजय मोहिते यांची निवड झाली.
जल्लोष साजरा करताना महापौर आणि उपमहापौर
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी आहे. पण, आजच्या महापौर निवडीवेळी सेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे लाटकर 11 मतांनी विजयी झाल्या. यावेळी लाटकर यांच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या बाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
हेही वाचा - महापौरपदाची खांडोळी कोल्हापूरला न शोभणारी; राजकीय अभ्यासकांचे मत
Last Updated : Nov 19, 2019, 1:56 PM IST