महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच समोर आले आणखी एक सत्य.. - कोल्हापूरमध्ये महिलेला कोरोनाची लागण

बावड्यातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच, आपणसुद्धा त्या महिलेबरोबर प्रवास केल्याची कबुली एका तरुणाने दिली आहे.

kolhapur
बावड्यातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण

By

Published : Apr 8, 2020, 7:37 PM IST

कोल्हापूर - सातारा कोल्हापुर असा रुग्णवाहिकेतून एका ६३ वर्षांच्या महिलेने प्रवास केला होता. याच रुग्णवाहिकेतून एका 26 वर्षांच्या तरुणाने अवैधरित्या प्रवास केला होता. मात्र, त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच आपणसुद्धा त्या रुग्णवाहिकेतून प्रवास केल्याची माहिती त्या तरुणाने दिली आहे.

कसबा बावड्यातील 63 वर्षांच्या वृद्ध महिलेने रुग्णवाहिकेतून प्रवास केला होता. याच रुग्णवाहिकेत हा तरुण आला होता. महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच तरुणाने तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून, आपणही त्याच रुग्णवाहिकेतून आल्याची माहिती दिली. हा तरुण करवीर तालुक्यातील विठलाईवाडीतील आहे. गावकऱ्यांनी गावात घेण्यास नकार दिल्याने तो करवीर तालुक्यातीलच खटांगळे गावात आपल्या बहिणीकडे राहिल्याची सुद्धा माहिती त्याने दिली.

हा तरुण कराडमध्ये नोकरीला होता. संबंधित तरुणाच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, तरुणाला सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. त्या तरुणाच्या कुटुंबियांना सुद्धा केले होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी कसबा बावड्यातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर 28 फेब्रुवारीला महिलेला साताऱ्याहून कोल्हापूरला आणण्यात आले होते. याप्रकरणी रुग्णवाहिकेच्या मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details