कोल्हापूर -कौटुंबिक वादातून नवऱ्याने पत्नी व मेहुण्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना राशिवडे ग्रामपंचायतीच्या आवारात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा आणि मेहुण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धक्कादायक : नवऱ्याने केली पत्नी अन् मेहुण्याची हत्या; कौटुंबिक वादातून घडला प्रकार - राशिवडे गाव कोल्हापूर
कोल्हापूरातील राशिवडे ग्रामपंचायतीच्या आवारात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवऱ्याने पत्नी आणि मेहुण्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या नंतर जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर नवऱ्याने केली पत्नी आणि मेहुण्याची हत्या
हेही वाचा...माझ्या सुनेचे चार जणांसोबत विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाणांचा खळबळजनक आरोप
कोल्हापूरातील राशिवडे ग्रामपंचायतीच्या आवारात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. पत्नी आणि मेहुण्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंजाबाई कावणेकर (४५) आणि केरबा येडके (४०) अशी मृतांची नावे असून हल्लेखोर सदाशिव कावणेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.