महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन्यथा विधानसभेला भाजपला मतदान नाही ; महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचा इशारा

विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभेला भाजपला मतदान नाही, असा इशारा समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती

By

Published : Aug 26, 2019, 4:55 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीस टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. 5 ऑगस्टपासून विविध टप्प्यांवर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज आंदोलनाचा २२ वा दिवस असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलक शिक्षकांनी केला आहे.

या आंदोलनावेळी विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा विधानसभेला भाजपला मतदान नाही, असा इशारा समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिला आहे. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थी-विद्यार्थिंनीदेखील या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

...अन्यथा विधानसभेला भाजपला मतदान नाही


महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या मागण्या-


१) २० टक्के अनुदान प्राप्त शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देणे.

२)अघोषित सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ग, तुकड्या यांना निधीसह घोषित करावे.

३) काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे.


ABOUT THE AUTHOR

...view details