कोल्हापूर-बेळगाव - महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून दोन्ही बाजूंचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच बेळगाव महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण संघटनेचा झेंडा लावल्याने वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तेथील मराठी भाषिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या वादग्रस्त झेंडा हटवण्याची मागणी करत मराठी भाषिकांनी महामोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी कोल्हापूर मधील शिवसैनिक बेळगावमध्ये जात होते. मात्र सर्वच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी बेळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. बंदी आदेश लागू असताना शिवसैनिकांचा बेळगाव मध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता.
शिवसैनिकांना बेळगाव पोलिसांकडून प्रवेश बंद-