महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

40 लाख सीमावासीयांना महाराष्ट्रात सामावून घ्या; महाराष्ट्र एकीकरण समितीची विनंती - border issue

१ नोव्हेंबर १९६५ला कर्नाटकची स्थापना झाली. या दिवसापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू झाला. दरवर्षी बेळगावातील आणि इतर सीमावर्ती भागातील मराठी भाषिक १ नोव्हेंबरला काळा दिवस पाळतात. यावर्षीही सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

Belgaum Demonstration
बेळगाव निदर्शन

By

Published : Nov 1, 2020, 4:40 PM IST

कोल्हापूर -गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे. कर्नाटक सरकार मोठ्या प्रमाणात दडपशाही करत आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकरणामध्ये लक्ष घालून सीमाभागातील 40 लाख मराठी भाषिक जनतेला महाराष्ट्रात सामावून घ्यावे, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र शासनाला सीमावादाच्या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली

कोरोनाचे कारण देत कार्यक्रमांना परवानगी नाकारली -

आज कर्नाटकचा स्थापना दिन आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना काळा दिन पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले होते. त्यानुसार सर्वांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता काळा दिन पाळला. गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक सरकार सीमाभागातील जनतेची मुस्कटदाबी करत आहे. यावर्षीही कोरोनाचे कारण पुढे करत कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका सरकारने घेतली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यक्रमांना परवानगी दिली नाही.

महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे -

कर्नाटक सरकारने कार्यक्रमांना परवानगी दिली नाही. मात्र, कोणत्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक गावांनी काळा दिन पाळला. सीमाभागाला आज पोलीस छावणीचे स्वरुप आले असून बेळगाव शहरात कोणालाही बाहेर फिरता येत नाही. कर्नाटक सरकारची ही दडपशाही आहे. आता महाराष्ट्र शासनाने यात लक्ष घालून सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घ्यावे, अशी विनंती मरगाळे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details