कोल्हापूर- हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, ढोल ताश्यांच्या गजरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतील रोड शो कोल्हापुरात पार पडला. दाभोळकर कॉर्नर परिसरातून 'रोड शो'ला सुरुवात झाली. यावेळी रथावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महाराष्ट्र उपप्रदेशाध्यक्ष धनंजय महाडिक आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
महाजनादेश यात्रेचा कोल्हापुरात रोड शो हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे कोल्हापुरात आगमन
शहरातील मुख्यमार्गावरून चाललेली ही यात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या पोस्टरबाजीच्या पार्श्वभूमीवर 'रोड शो'च्या मार्गावर पोलिसांची करडी नजर होती. दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकीज, हॉकी स्टेडियम मार्गे ही यात्रा कळंबा येथे आली. याठिकाणी नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
हेही वाचा -कोल्हापुरात मुख्यमंत्री अन् महसूलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे
'रोड शो'च्या मार्गावर ठिक-ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात्रेच स्वागत केले. कळंबानंतर ही यात्रा इस्पुर्लीमार्गे राधानगरीकडे रवाना झाली. या यात्रेच्या निमित्ताने शहर परिसरात भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.