कोल्हापूर- छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या 35 व्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गट आमने-सामने आलेत. यावेळी महादेवराव महाडिक यांचे भाषण सुरू असताना पाटील समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय पाटील गटाकडून भर सभेत पत्रकंसुद्धा भिरकावण्यात आली. यानंतर दोन्ही बाजूकडून नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा - दोन आत्मासमर्पित नक्षलवाद्यांवर नक्षलवाद्यांचा गोळीबार ; एक ठार तर एक जखमी